जिथून सुरुवात झालीउकडीचे मोदक
Steamed Modak
Savoury Shankarpali
तेच खुसखुशीत चौकोन, साखरेच्या जागी हलकीशी तिखट चव.
₹110 प्रति 250 ग्रॅम
मैदा
तुपाचं मोहन
तीळ
मैदा
तुपाचं मोहन
तीळप्रत्येक फराळाच्या डब्यात गोड शंकरपाळी असते, आणि चांगल्या डब्यात तिच्या शेजारी तिखटही. पीठ तेच, मैदा आणि तुपाचं मोहन, पण साखरेची जागा लाल तिखट, चिमूटभर ओवा आणि तीळ घेतात. मग तेलातून बाहेर आलेले चौकोन गोड नाहीत, तर कुरकुरीत, सोनेरी आणि हलकेसे तिखट.
चहासोबत काहीतरी खारट हवं असतं तेव्हा हात हिच्याकडेच जातो. करंज्यांच्या मधून शोधून काढली जाते ती हीच, आणि हिच्यामुळेच गोड शंकरपाळी आणखी गोड लागते.
दिवाळी फराळाच्या ऑर्डर्स फुल्ल!
अवघ्या 5 दिवसांत सगळ्या ऑर्डर्स भरल्या! आमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त प्रतिसाद तुम्ही दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
चवीशी आणि गुणवत्तेशी कुठलीही तडजोड होऊ नये, म्हणून या वर्षीच्या ऑर्डर्स आम्ही लवकर बंद करत आहोत. ज्यांना या वेळी फराळ देऊ शकलो नाही, त्यांची आम्ही मनापासून माफी मागतो.