
01तीच सकाळ
सुरुवात एका गंधाने.
आमच्या घरी प्रत्येक सण याच दरवळाने सुरू व्हायचा. सगळे उठायच्या आधी आई गॅसपाशी, बेसन हळूहळू सोनेरी होत जाणारं, आणि सूर्य वर यायच्या आत घरभर तुपाचा गंध. ताटासाठी लाडू, चारच्या चहासाठी चिवडा, आणि पाहुणे येणार म्हणून मिटून ठेवलेल्या करंज्या.

02नावातला अर्थ
घरगुती. गोडवा.
घरगुती गोडवा म्हणजे तीच सकाळ, जपून ठेवलेली. घरगुती म्हणजे घरचं. गोडवा म्हणजे चवीतला, आणि मनातलाही. पाहुणा आला की समोर येणारं ताट, दिवाळीच्या आठवड्यात दिवसातून दहादा उघडणारा फराळाचा डबा, आणि आता दुसऱ्या शहरात राहणाऱ्या लेकरासाठी बांधून दिलेलं पार्सल.

03सुरुवात
सुरुवात झाली उकडीच्या मोदकांनी.
सुरुवात झाली 2020 मध्ये, उकडीच्या मोदकांनी. पहिल्या ऑर्डर मित्रमंडळींच्या, मग त्यांच्या ओळखीच्यांच्या, आणि असं करत करत वर्तुळ हळूहळू वाढत गेलं. आमचं कारण तेव्हाही साधं होतं आणि आजही तेच आहे. झटपट पदार्थांच्या बाजारात खरी महाराष्ट्रीय चव हरवत चालली आहे, आणि आम्हाला घरची चव जपायची आहे, जी पहिल्या घासाला आपल्या घरची आठवण करून देते.


