मुख्य मजकुराकडे जा

पौष्टिक

नाचणी लाडू

Ragi Laddu

म्हणतात आरोग्यासाठी. आम्ही चवीसाठी बनवतो.

₹125 प्रति 250 ग्रॅम

21 दिवसांत उत्तमपरवाना क्र. 21520160000860
Ragi Laddu (नाचणी लाडू)
  • नाचणी
  • गूळ
  • साजूक तूप

पौष्टिक म्हणून बनतो, चवीसाठी संपतो

नाचणी म्हणजे आजीच्या भरवशाचं धान्य. दिसायला साधं, रंगाने गडद, कोरड्या जमिनीतही तक्रार न करता पिकणारं; पण ताकदीच्या बाबतीत स्वयंपाकघरातल्या साऱ्यांना मागे टाकणारं. नातवंडं सशक्त व्हावीत असं वाटलं की आजीचा हात आपसूक याच डब्याकडे जायचा.

खरी अडचण असायची ती चवीची. पण घरांनी ती घरच्याच पद्धतीने सोडवली: गूळ, तूप आणि सबुरी. मंद आचेवर भाजलेलं नाचणीचं पीठ खमंग होतं, त्यात गूळ विरघळतो, आणि 'पौष्टिक म्हणून' बनवलेला लाडूच डब्यातून सगळ्यात आधी संपू लागतो.

या लाडवाला साखरेचा स्पर्शही होत नाही. म्हणूनच तो शाळेच्या डब्यातही जातो आणि आजोबांच्या चहासोबतही बसतो, सारख्याच हक्काने.

तीन प्रामाणिक पावलं, काही वाढवलेलं नाही, काही लपवलेलं नाही.

हा लाडू असा घडतो

तागावर पितळी वाट्यांमध्ये अख्खी नाचणी, हाताने फोडलेला गूळ आणि छोट्या वाटीत तूप
01

नाचणी, गूळ, तूप

नाचणी ताजी दळलेली, गडद गूळ हाताने फोडलेला, आणि तूप तेच साजूक तूप जे आमच्या प्रत्येक लाडवात जातं. शंभर वर्षांपूर्वीच्या कुठल्याही शेतघरात सापडतील अशाच तीन गोष्टी.

लोखंडी कढईत तुपात सावकाश भाजलं जाणारं नाचणीचं पीठ
02

गहिरी भाजणी

नाचणी बेसनपेक्षा जास्त संयम मागते. पीठ मंद आचेवर सावकाश भाजलं जातं; त्यातून उबदार मातीचा आणि भाजक्या धान्याचा गंध येईपर्यंत, आणि रंग आणखी गहिरा होईपर्यंत. लाडवाची चव इथेच कमावली जाते.

तयार लाडूंच्या पितळी ताटावर गोल नाचणी लाडू धरलेले हात
03

उरलेलं काम गुळाचं

गूळ वितळवून आचेवरून उतरवल्यावर मिसळला जातो, म्हणजे तो मऊ राहतो, आणि मिश्रण कोमट असतानाच लाडू वळले जातात. गडद, तुकतुकीत, आणि दिसतात त्याहून हातात जड.

म्हणतात आरोग्यासाठी. आम्ही चवीसाठी बनवतो.

सर्व लाडू →
1